शिवाजी पार्कवरील संचलनात निवडणूक आयोगाचा चित्ररथ 

शिवाजी पार्कवरील संचलनात निवडणूक आयोगाचा चित्ररथ 

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73 व 74 व्या राज्यघटना दुरुस्तीला 25 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने येथील शिवाजी पार्कवर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या हस्ते या चित्ररथाच्या प्रतिकृतीचे आज येथे अनावरण करण्यात आले. 

73 आणि 74 व्या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली आणि त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाचीही स्थापना करण्यात आली. शिवाय आता बृहन्मुंबईसह 10 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा व 296 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा चित्ररथ तयार करण्यात येत आहे. चित्ररथाचे संकल्पना चित्र सर ज. जी. कला महाविद्यालयाचे असून, तेच त्याची निर्मितीही करणार आहेत. चित्ररथाच्या प्रथम दर्शनी भागावर उडत्या श्वेत अश्वाचे शिल्प असेल. ते भारताचे राष्ट्रीय चिन्ह असलेल्या अशोक स्तंभावरून घेतले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या प्रातिनिधिक स्वरूपात इमारती दर्शविल्या जातील. चित्ररथावर मतदारांना मतदानासाठी आवाहन करणारा जिवंत देखावाही असेल. चित्ररथाच्या मागील बाजूस एलइडी पडदा असेल. त्यावर मतदार जागृतीसंदर्भातील घोषवाक्‍य, पोस्टर्स, चित्रे, ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com