शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

Thane-Municipal
Thane-Municipal

ठाणे महापौरांवर नाराजी; भोईर कुटुंबीय ‘मातोश्री’वर जाणार
ठाणे - महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महासभेतच अपमान केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक देवराम भोईर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर तीन नगरसेवकांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिक्षण मंडळाच्या ‘शाळा आपल्या दारी’ मुद्द्यावरून शिवसेनेच्या गटात जोरदार खडाजंगी झाली. भोईर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील नगरसेवकांना बोलण्याचे थांबवल्याने भोईर कुटुंबीय नाराज झाले. शनिवारी झालेल्या महासभेत हा प्रकार घडला. 

राष्ट्रवादीने शनिवारीदेखील महासभेवर बहिष्कार टाकला. असे असताना महासभा सुरळीत होईल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत होते; परंतु शिक्षण मंडळाच्या ‘शाळा आपल्या दारी’च्या मुद्द्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी याच अनुषंगाने मांडलेल्या लक्षवेधीची महापौरांना आठवण करून दिली. त्यानंतर शिक्षण मंडळातील त्रुटीबाबतही चर्चा केली. याच मुद्द्याच्या अनुषंगाने संजय भोईर, उषा भोईर, भूषण भोईर यांनीदेखील चर्चा वाढविली. त्यावर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, हा महत्त्वाचा विषय असल्याचे सांगितले. त्‍यावर महापौरांनी देवराम भोईरांना खडेबोल सुनावले.

वाद मिटवण्यात म्हस्के अयशस्वी
ज्येष्ठ नगरसेवकाचा अवमान झाल्याचे सांगत भोईर कुटुंबीयांनी सभात्याग केला. त्यानंतर नरेश म्हस्के यांच्याशी त्यांची चर्चा झाली. आम्ही याचसाठी पक्षात आलो होतो का, असा अपमान करायचा होता का? अशीदेखील विचारणा केली. म्हस्के यांनी त्यांची समज काढण्याचा प्रयत्न केला; परंतु भोईर यांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच झालेल्या प्रकाराची लेखी तक्रार करणार असल्याची माहिती संजय भोईर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com