सोमय्या, परब प्रभाव पाडण्यात अपयशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरून एकमेकांना भिडत असताना वृत्तवाहिन्यांवर एकमेकांवर आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या व शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब हे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावरून एकमेकांना भिडत असताना वृत्तवाहिन्यांवर एकमेकांवर आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या व शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब हे त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले आहेत.

ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्या होमपिचवर मुलुंडमध्ये सहा नगरसेवक निवडून आले असले, तरी त्यातील भाजपचे तीन विद्यमान नगरसेवक होते; तर प्रभाकर शिंदे हे माजी नगरसेवक आहेत. भांडुपमधील निवडून आलेल्या सारिका पवार यांचे पती गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आले होते. खासदार असतानाही मानखुर्दमध्ये सोमय्या प्रभाव पाडू शकले नाहीत. तेथे आठवले गटाचा एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही. तशीच परिस्थिती अनिल परब यांच्या विभागात झाली. अनिल परब यांच्याकडे वांद्य्रापासून अंधेरीपर्यंतची जबाबदारी आहे; मात्र येथे शिवसेनेच्या मातब्बर उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. या भागातील 44 प्रभागांपैकी 16 प्रभाग जिंकण्यात शिवसेनेला यश आले; मात्र यात अंधेरी पश्‍चिम व वर्सोवा येथे शिवसेनेला फटका बसला आहे. विलेपार्ले व अंधेरी पूर्वमध्येही शिवसेनेला अपेक्षित यश आले नाही. वांद्रे, जोगेश्‍वरीमधील यशामुळे हा आकडा वाढला आहे.

- ऍड. अनिल परब - 44 प्रभागांपैकी 16 प्रभाग जिंकले.
- किरीट सोमय्या - 40 प्रभागांपैकी 12 प्रभाग जिंकले.

मुंबई

बेलापूर - सीबीडी सेक्‍टर २१ आणि २२ मधील आयकर कॉलनीतील सिडकोने बांधलेल्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथील रहिवासी...

06.06 AM

नवी मुंबई -पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत लावण्यात येणाऱ्या ४० हजार रोपांपैकी केवळ २५ हजार रोपांची लागवड करण्यात पालिकेला यश आले...

05.33 AM

बेलापूर - सीबीडी बेलापूर येथील बेलापूर जंक्‍शन हा उरण रोडवरील महत्त्वाचा चौक आहे. या मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने येथील...

05.03 AM