एसटीचा कारभार मराठीतूनच होणार!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - एसटी महामंडळाने प्रशासकीय कामकाज पूर्णपणे मराठीतून करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तरीही मराठी वापरण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीच्या अधिकाऱ्यांवर महामंडळ कारवाई करणार आहे. याबाबत महामंडळाने पत्रक काढले असून महामंडळातील 100 टक्के कामकाज मराठीतून करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

मराठी दिनाचे औचित्य साधून महामंडळाने मराठीकरणाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सहकार्य न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बढती आणि पगारवाढ रोखून धरावी, कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा आदेश एसटीच्या सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी विभाग नियंत्रक किंवा घटक प्रमुखांनी सादर करणे बंधनकारक आहे.

महामंडळात इंग्रजी आद्याक्षरे व इंग्रजी आकड्यांऐवजी त्या जागी मराठीचा वापर करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची नोंदही इंग्रजी आद्याक्षरानुसार होते. नावांच्या पाट्या व कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरही इंग्रजी अक्षरे दिसतात. यात बदल करून हेच नाव मराठी आद्याक्षराने सुरू करावे, अशी सक्ती करण्यात आली आहे. कामकाजातील शेरे व टिप्पणीवरील स्वाक्षरीही मराठीतच असावी. नाव, पदनाम, तारीख व पत्रव्यवहारासह महामंडळाचा सर्व लेखाजोखा मराठीत करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: st work in marathi