प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निदर्शने

Mission-Admission
Mission-Admission

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रवेशाबाबत निर्णय दिल्याने अल्पसंख्याक महाविद्यालयातील रिक्त जागा पुन्हा महाविद्यालयांकडे सुपूर्द करण्यात आल्या. यामुळे दुसऱ्या गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्‍के गुण असतानाही अल्पसंख्याक महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी (ता. २१) उपसंचालक कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली. शिक्षण विभागाविरोधात घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मागणी केली.

विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. ऑनलाईन प्रवेशानंतर या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेरी राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालक न्यायालयात दाद मागणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयाबाबत शिक्षण विभाग न्यायालयात आमची बाजू मांडणार नसेल तर आम्ही स्वत: न्यायालयीन लढाई लढू, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com