वीज कामगारांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्त सरसकट 13 हजार ते 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यास बुधवारी तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्याबाबतची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे.

वीज कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी या कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे केली होती, पण बुधवारी झालेल्या व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांमधील बैठकीत 13 हजार ते 15 हजार रुपये तत्त्वतः देण्याचे कबूल करण्यात आले. या बैठकीस 22 वीज कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आणि महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव कुमार मित्तल उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना मूळ पगाराएवढे सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार संघटनेचे सरचिटणीस राकेश जाधव यांनी केली. बिपीन श्रीमाळी यांनी मात्र कृती समितीच्या मागणीवर विचार करत तीन दिवसांमध्ये सानुग्रह अनुदानाबाबत निर्णय घेण्यात येईल, याबाबतची घोषणा ऊर्जामंत्र्यांकडून होईल असे स्पष्ट केले.

टॅग्स