मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

या कारणामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सध्या 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. चाकरमान्यांचे हाल झाले असून, ठाणे स्थानकावर नागरिकांची गर्दी झाली आहे.

मुंबई - विक्रीळीजवळ लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक लवकरच पूर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळीजवळ लोकल बंद पडली असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. धीम्या मार्गावर लोकल बंद पडली असून सीएसटीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. लोकल सध्या हटवण्यात आली असून धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आली आहे. 

या कारणामुळे सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल सध्या 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. चाकरमान्यांचे हाल झाले असून, ठाणे स्थानकावर नागरिकांची गर्दी झाली आहे.