साखर सात रुपयांनी स्वस्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मुंबई - किरकोळ बाजारात साखर सात रुपयांनी स्वस्त झाली आहे. वर्षभर 40 ते 42 रुपये किलोवर असणाऱ्या साखरेचा भाव 35 रुपये किलोपर्यंत कमी झाला आहे. साखरेचे वाढीव उत्पादन पाहता भाव आणखी उतरण्याची शक्‍यता मुंबई शुगर मर्चंटने व्यक्त केली आहे.

देशात वर्षभर अडीच लाख टन साखरेला मागणी असते. या वर्षी साखरेचे उत्पादन तीन लाख टनांवर गेले आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत या वर्षी 60 लाख टन अतिरिक्त साखर आहे; तसेच मागील हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखरेचा शिल्लक साठा आहे. राज्यामध्ये उसाचे पीकही मोठ्या प्रमाणात आल्याने साखर उत्पादन वाढले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या साखरेचे 50 ट्रक येत आहेत.

Web Title: sugar rate decrease