कर्ज माफ न झाल्याने आदिवासी शेतकऱ्याची आत्महत्या

भगवान खैरनार
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मोखाडा : जव्हार तालुक्यातील हातेरी येथील धनाजी विका जंगली (वय 60) या आदिवासी शेतकऱ्याने कर्जमाफी न झाल्याच्या नैराश्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.4) घडली आहे. त्यामुळे सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी ठरल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे, शेतकरी आत्महत्येचे लोण पालघरच्या आदिवासी भागात ही पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. 

धनाजी विका जंगली (वय 60) यांनी जामसर आदिवासी विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सन 2016 मध्ये 42 हजार   207 रूपयांचे पिक कर्ज घेतले होते. या रकमेतून धनाजीने आपल्या शेतात भाजीपाला लागवड केली होती. मात्र, त्यावर रोगांचा प्रार्दुभाव झाल्याने संपूर्ण पिक वाया गेले. त्यांच्या हाती काहीही लागले नाही. पैसे हाती नसल्याने धनाजीने गतसाली शेतीच केली नाही. त्या दरम्यान कर्जाचा बोजा डोक्यावर अधिकच वाढला.

दरम्यानच्या काळात शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार धनाजीने आपले कर्ज माफ व्हावे यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, आपल्या परिसरातील सहकाऱ्यांना कर्ज माफ झाले, आपल्याला माफ झाले नाही. याचे नैराश्य आपल्याला असल्याचे त्याने, आपल्या सहकाऱ्यांना अनेकदा सांगितले असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. याचेच नैराश्य मनात ठेवून, धनाजीने आपल्या शेतातील ऊंबराच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. आमच्या बाबाने कर्जमाफीची अपेक्षा ठेवून, नैराश्यातुन आपले जीवन संपवले आहे , आता तरी सरकार जागे होऊन आमची कर्जमाफी करून आम्हाला नुकसान भरपाई देण्याची मागणी धनाजीचा मुलगा जगदीश जंगली याने केली आहे. 

Web Title: suicide by tribal farmer cant recover loan