नोटाबंदीला पाठबळ द्याः उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

मुंबईः नोटाबंदीसंदर्भात दाखल झालेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) फेटाळली. नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिलाच; शिवाय सरकार काळ्यापैशाला रोखण्यासाठी करत असलेल्या उपायांना पाठबळ दिले पाहिजे, असे मतही मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांच्या खंडपीठाने व्यक्त केले. 

अखिल चित्रे यांनी नोटाबंदीसंदर्भात याचिका दाखल केली होती. 'पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे नागरीकांना त्रास होत आहे. त्यासंदर्भात न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश द्यावेत,' अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. 

'केंद्र सरकार काळ्या पैशाच्या समांतर अर्थव्यवस्थेविरोधात कारवाई करीत आहे. ही कारवाई चुकीची आहे, असे म्हणता येणार नाही,' असे न्यायमूर्ती चेल्लूर यांनी स्पष्ट केले. 'लोकांना काही त्रास होत असेल, तरीही या निर्णयाला पाठबळ दिले पाहिजे,' अशी टीप्पणीही न्यायमूर्तींनी केली. सरकारला कोणतेही निर्देश देण्यास स्पष्ट नकार देत उच्च न्यायलयाने सांगितले, की सर्वोच्च न्यायलयात यासंदर्भात याचिका दाखल आहेत; त्यामुळे उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर ढवळाढवळ करणे योग्य होणार नाही.

मुंबई

मुंबई : निकालांचा गोंधळ सुरू असल्याने काही महाविद्यालयांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याच्या...

07.06 PM

उल्हासनगरः पूर्वीच्या अटीशर्ती मध्ये विजेचे अधिकृत कनेक्शन हि नवीन अट लावण्यात आली आहे. कनेक्शन तरच गणेशोत्सव मंडळांना परवाना...

06.57 PM

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विजयाची परिक्रमा कायम ठेवत मुंबई जवळील मीरा-भाईंदर महानगरपालिकेवर भाजपने विजयी झेंडा फडकला...

05.39 PM