टॅब चार्जिंगसाठी 550 रुपयांचा प्लग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब चार्ज करण्यासाठी त्यांना आता रांग लावावी लागणार नाही. त्यासाठी या विद्यार्थ्यांच्या वर्गांत स्वतंत्र चार्जिंग पॉईंट आणि स्पाईक गार्ड बसवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र एक प्लग बसवण्यासाठी पालिका तब्बल 550 रुपये मोजणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव या आठवड्यात होणाऱ्या स्थायी समिती बैठकीच्या पटलावर मांडण्यात आला असून, या प्लगच्या किमतीवरून वाद होण्याची शक्‍यता आहे. 

पालिकेने आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी 27 हजार टॅब दिले. मात्र, ते चार्ज करण्यासाठी वर्गांत सोय नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यासाठी रांगा लावाव्या लागतात. या पार्श्‍वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांच्या वर्गांत सात हजार 224 स्पाईक गार्ड आणि सात हजार 224 प्लग बसवण्यात येणार आहेत. प्रत्येक स्पाईकगार्डसाठी पालिका 450 रुपये, तर प्लग लावण्यासाठी 550 रुपये मोजणार आहे. या कामासाठी पालिका 91 लाख रुपये खर्च करणार आहे.
 
दरम्यान, पालिकेने दिलेल्या टॅबचा उपयोग विद्यार्थ्यांना कितपत होतो, हा प्रश्‍नच आहे. हे टॅब ठरलेल्या दर्जानुसार देण्यात आले नव्हते, असा आरोपही झाला होता. प्लगसाठी 550 रुपये मोजून पालिका स्वत:च्या तिजोरीलाच शॉक देत आहे. एवढ्या महाग किमतीत हे प्लग पालिकेला कोण विकत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. त्याबाबत स्थायी समितीत आवाज उठवू, असा इशारा मनसेचे सदस्य संतोष धुरी यांनी दिला.
 
एकच कंत्राटदार; तरीही प्रस्ताव
पालिकेच्या निविदा प्रक्रियेत एकच कंत्राटदार सहभागी झाल्यास सहसा फेरनिविदा मागवल्या जातात. मात्र, पालिकेने या वेळी फेरनिविदा न काढता त्याच कंत्राटदाराला प्लग आणि स्पाईक गार्ड पुरवण्याचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Web Title: Tab plug for charging Rs 550