नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करा : न्यायालय

Take action on school bus violation of law order byCourt
Take action on school bus violation of law order byCourt

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील स्कूल बसच्या वापरामध्ये नियमांचे उल्लंघन केले जात आहे का, याबाबत तपासणी आणि योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. नियमानुसार स्कूल बसमध्ये महिला सहायक ठेवणे बंधनकारक आहे, तसेच गाडीच्या खिडक्‍यांना जाळ्या लावणे, त्यामध्ये पुरेशी सुरक्षा व्यवस्था असणे आणि मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आदी नियम आहेत. 

राज्य सरकारच्या वतीने सध्या स्कूल बस तपासणी मोहीम सुरू असून आणखी काही दिवस ही मोहीम राबवण्यात येणार आहे, असे प्रमुख सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी खंडपीठाला सांगितले. या तपासणीचा कृती अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी 17 जुलैला होणार आहे. 

कृती अहवाल सादर करा 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमधील स्कूल बस चालकांसाठी विविध मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्यात आली आहेत; मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका पालक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवारी न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसचालकांवर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुंबईसह राज्यभरातील सर्व स्कूल बसची तपासणी करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. येत्या मंगळवारपर्यंत (ता. 17) सरकारने केलेल्या कारवाईचा कृती अहवाल दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. 

हे आहेत नियम 

महिला सहायकाची नेमणूक 
खिडक्‍यांना जाळ्या लावणे 
पुरेशी सुरक्षा व्यवस्था 
मर्यादित विद्यार्थ्यांना प्रवेश 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com