ठाण्यात रेस्टॉरंटमध्ये श्‍वानांसाठी "टी पार्टी' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

ठाणे - शहरातील नागरिकांना खाणे- पिणे- खेळणे यांसारख्या मनोरंजनाच्या गोष्टी मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे विशेष श्रम घ्यावे लागत नाहीत. माणसाला हवे ते मागता येते; मात्र श्‍वान किंवा अन्य प्राण्यांना बोलताच येत नसल्याने त्यांच्या मनोरंजनाचा विशेष असा विचार होत नाही. याच जाणिवेतून ठाण्यातील काही प्राणिमित्रांनी एकत्र येऊन ठाण्यातील पाळीव श्‍वानांसाठी चक्क "टी पार्टी'च ठेवली होती. येथील रेस्टॉरंटमध्ये रविवारी (ता. 2) या कुत्र्यांसाठी खास व्यवस्था केली होती. या पार्टीत काही मांजरांनीही सहभाग नोंदविला. 

ठाणे शहरात "पेट ओनर्स ऍण्ड ऍनिमल लव्हर्स' ही संस्था काही वर्षांपासून प्राण्यांसाठी कार्यरत आहे. प्राण्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने "डॉग टी पार्टी'चे आयोजन केले होते. याला शहरातील विविध प्रजातींच्या श्‍वानांनी हजेरी लावली होती. वेगवेगळ्या वेशभूषेत आलेल्या त्यांच्यासाठी संगीत खुर्चीपासून ते लिंबू- चमचा या खेळापर्यंत विविध खेळही ठेवले होते. शिवाय, हॉटेलमध्ये बसून आइस्क्रीमपासून ते आवडीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद या कुत्र्यांनी घेतला. चिकन सूप व व्हेज सूपचा खास बेत होता. त्यासोबतच व्हॅनिला आइस्क्रीम, पनीरचे विविध पदार्थ असा मेन्यू होता. या वेळी झालेल्या खेळातील विजेत्या श्‍वानांना बक्षिसेही देण्यात आली. 

श्‍वानांसाठी विशेष रेस्टॉरंटची संकल्पना 
कुटुंबाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून कुत्र्यांना घरात स्थान दिले असले, तरी समाजात वावरत असताना सार्वजनिक ठिकाणी श्‍वानांना नेण्यात मर्यादा येतात. श्‍वानांसाठी विशेष रेस्टॉरंटची संकल्पना अद्याप आपल्याकडे रुजली नसली, तरी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचा विचार या मंडळींनी केला होता. त्यातूनच "डॉग टी पार्टी'ची संकल्पना समोर आली. यासाठी एक खास रेस्टॉरंट आरक्षित करण्यात आले होते. मानसशास्त्रज्ञ भास्कर चौहान यांनी प्राण्यांच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी दर्शवणारे खेळ सादर केले. श्‍नानांबरोबरच त्यांच्या "पालकां'नाही या खेळाचा आनंद घेता आला, अशी माहिती प्राणिमित्र आदिती नायर यांनी दिली. 

Web Title: Tea Party for dog in restaurants