तांत्रिक गोंधळामुळे नाही मतदारयादीचा पत्ता 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष मोहीम 
नव्या प्रभाग रचनेनंतर 33 प्रभागांमध्ये 131 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत 53.26 टक्के मतदानाची नोंद झाली होती; परंतु यंदा ही टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याहीपुढे जाऊन, पालिकेच्या निवडणूक विभागाने मागील निवडणुकीत प्रत्येक प्रभागाची मतदानाची टक्केवारी काढली आहे. त्यानुसार कोणत्या प्रभागात मतदानाची टक्केवारी अधिक आणि कोणत्या प्रभागात कमी याची रितसर वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या प्रभागात मतदानाचा टक्का कमी होता, त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित करून तेथील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेने आता विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

ठाणे - तांत्रिक गोंधळामुळे येथील मतदारांना अद्याप मतदारांची अद्यावत यादी मिळालेली नाही. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी 21 जानेवारीला प्रसिद्ध होणे अपेक्षित होते; मात्र सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने अद्याप ती मतदारांपर्यंत पोहचलेली नाही. महापालिकेच्या संबधित निवडणूक अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री यादी दिल्याचा दावा केला आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीत 12 लाख 28 हजार 592 मतदार मतदान करणार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या 6 लाख 63 हजार 773 एवढी, तर स्त्री मतदारांची संख्या 5 लाख 64 हजार 808 आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत 33 हजार 756 मतदारांची वाढ झाली आहे. 

महापालिकेच्या 2007 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 12 लाख 65 हजार 551, तर मतदारसंख्या 9 लाख 9 हजार 573 एवढी होती. 2012 च्या निवडणुकीत ती 11 लाखांच्यावर लोकसंख्या गेली. 11 लाख 94 हजार 836 इतकी मतदारसंख्या होती. आता फेब्रुवारीत होणाऱ्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदारयादीत 11 लाख 48 हजार मतदारांची नोंदणी झाली होती. अंतिम यादी पुढे आली असून, यात 8 हजार 592 नव्या मतदारांची भर पडली आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत ही वाढ केवळ 33 हजार 756 एवढीच आहे. दरम्यान, 21 जानेवारीला जाहीर होणारी अंतिम यादी आज चार दिवस उलटले, तरी पालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेली नाही. 

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विशेष मोहीम 
नव्या प्रभाग रचनेनंतर 33 प्रभागांमध्ये 131 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत 53.26 टक्के मतदानाची नोंद झाली होती; परंतु यंदा ही टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याहीपुढे जाऊन, पालिकेच्या निवडणूक विभागाने मागील निवडणुकीत प्रत्येक प्रभागाची मतदानाची टक्केवारी काढली आहे. त्यानुसार कोणत्या प्रभागात मतदानाची टक्केवारी अधिक आणि कोणत्या प्रभागात कमी याची रितसर वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या प्रभागात मतदानाचा टक्का कमी होता, त्या भागावर अधिक लक्ष केंद्रित करून तेथील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेने आता विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: Technical probelm for voting list