बदलापूर : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन, शिवसेनेचा विरोध!

भूमिपूजन साठी खासदार आले तर, कार्यक्रमात काळे झेंडे दाखवु!
Kapil Patil
Kapil PatilSakal Digital

बदलापूर :हेंद्रेपाडा परिसरातील पालिकेच्या जिमखाना येथे नव्याने उभारत असलेल्या क्रीडा मैदानाच्या भूमिपूजनाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून, त्याच बरोबर शहरात प्रशासक राजवट असताना, पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला शिवसेना शाखा प्रमुख भरत नवगीरे यांनी विरोध दर्शवला असून, नियमबाह्य कार्यक्रम राबवला तर या भूमिपूजन कार्यक्रमाच्या वेळी आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार असल्याचे भरत नवगीरे यांनी सांगितले.

बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा परिसरात कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून जिम खाण्याची सोय देण्यात आली आहे या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या आरक्षित भूखंडावर पहिल्या टप्प्यात विविध खेळांसाठी आवश्यक असलेली खेळपट्टी तयार करण्यात आलेले आहे तर आता याच जागेत दुसऱ्या टप्प्यातील खेळांचे मैदान उभारण्याच्या दृष्टिकोनातून, माजी नगराध्यक्ष, भाजपा ठाणे जिल्हा प्रवक्ता राजेंद्र घोरपडे यांनी येत्या १९ मार्च २०२२ रोजी केंद्रीय राज्यमंत्री व खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, या कार्यक्रमाला शिवसेना शाखाप्रमुख भरत नवगिरे यांनी विरोध केला असून, या कामाची अद्याप निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. तसेच सध्या शहरात प्रशासक राजवट असताना पक्षांच्या माध्यमातून भूमिपूजनाचा कार्यक्रम कसा घेतला जातो? यावर आक्षेप घेत या कार्यक्रमाला आपला विरोध दर्शवला आहे.

पालिकेने हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा, 19 मार्च रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला तर, खासदारांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला शिवसेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला जाणार असल्याचे भरत नवगिरे यांनी स्पष्ट केले. शहरातील खेळाडूंना हक्काचे मैदान देण्याच्या नावाखाली हे मैदान खाजगी पद्धतीने वापरले जात असून, या माध्यमातून पैसे कमावण्याचा घोरपडे यांचा हा व्यवसाय असल्याची टीका देखील यावेळी भरत नवगिरे यांनी केली.तरी या संदर्भात पालिकेचे नगर अभियंता संजय कुंभार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी अद्याप या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाहीये, कोणालाही अद्याप या कामाची मंजुरी मिळाली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com