दाऊद, अनिसही ठाणे पोलिसांच्या रेकॉर्डवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

ठाणे - कुख्यात गुंड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर याच्याविरोधात तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर न्यायालयाने इक्‍बालच्या पोलिस कोठडीत 10 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली. या प्रकरणात इक्‍बालकडून नवे-नवे खुलासे समोर येण्याची शक्‍यता वर्तवली जात असून, ठाणे नगर पोलिसांत इक्‍बालबरोबरच दाऊद व अनिस इब्राहीमवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इक्‍बाल कासकर, मुमताज शेख आणि इसरार सय्यद यांच्यावर कासारवडवली व ठाणे नगर पोलिस ठाण्यात खंडणी आणि धमकावण्याचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. याआधी इक्‍बालला सराफाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी 13 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती, तर गोराई येथील जमिनीसाठी तीन कोटी रुपये खंडणी उकळल्याच्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी 10 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गोराई जमीन प्रकरणात कमाल जमीन धारणा अधिनियम कायद्यानुसार काही महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला बिल्डरच फिर्यादी आहे. त्यामुळे तक्रारदाराच्या नावाबाबत पोलिसांकडून गुप्तता बाळगली जात आहे. गोराई प्रकरणात दाऊद इब्राहीम व अनिस इब्राहीम याने फोनवरून निर्देश दिल्याचे उघड झाल्याने दोघेही ठाणे नगर पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. इक्‍बाल याच्यावर खंडणी व धमकावल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल झाल्याने ठाणे पोलिस आता त्याच्यावर "मोक्का'अंतर्गत कारवाईची चाचपणी करीत आहेत.