ठाण्यात नवरात्रोत्सवाची धूम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

ठाणे - अवघ्या आठवड्यावर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीची लगबग ठाण्यात सुरू आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथील प्रसिद्ध नवरात्रोत्सवाच्या मंडपाच्या भूमिपूजनानंतर आता भव्यदिव्य सजावटीचे काम अहोरात्र सुरू आहे. 

जय अंबे माँ सार्वजनिक विश्‍वस्त संस्थेतर्फे ठाणे पश्‍चिमेकडील टेंभी नाका या ठिकाणी मोठ्या स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी या नवरात्रोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. टेंभी नाक्‍यावरील नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसात टेंभी नाक्‍यावर मोठी गर्दी उसळते. दर वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी देवीच्या मंडपाचे पूजन केले जाते. यंदाही शिवसेनेचे संपर्कप्रमुख पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंडपाचे विधिवत भूमिपूजन करून सजावटीला प्रारंभ करण्यात आला. त्यानुसार अहोरात्र कार्यकर्ते नवरात्रोत्सवाच्या कार्यासाठी झटत असून, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा चमू सजावटीचे काम करीत आहे. यंदाही डोळे दिपवणाऱ्या विद्युत रोषणाईने सजलेल्या सम्राट अशोकाच्या राजमहालाची प्रतिकृती उभारली जात आहे. त्यानंतर मुख्य सजावटीला सुरुवात होणार असून, येत्या चार दिवसांत सजावटीचे काम पूर्ण होईल, अशी माहिती सजावट करणारे सचिन पांचाळ यांनी दिली.