कल्याणमध्ये रस्तेदुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला शुक्रवारी सकाळी सुरुवात केली. 

आयुक्त पी वेलरासू यांनी शास्त्रोक्‍त पद्धतीने पॅचवर्क करण्याचे आदेश बांधकाम विभागास दिल्यानंतर पालिका शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांच्या देखरेखीखाली रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली; मात्र सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काम थांबवण्यात आले. 

शहरातील रस्ते आणि पुलावर मोठे खड्डे पडले असून, वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याबाबतची बातमी ‘सकाळ’च्या ठाणे टुडेमध्ये आज (ता. १३) ‘कल्याणमध्ये वाहनांच्या रांगा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाल्यानंतर याची तातडीने दखल घेत पालिकेने कल्याण पूर्व पश्‍चिमेला जोडणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली. खड्डे बुजवताना अधिकाऱ्यांनी सेल्फी काढत कामाचे अपडेट वरिष्ठांना पाठवले.

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी १५ ऑक्‍टोबरपासून कार्यक्रम आखला होता; मात्र दोन दिवस आधीच कामाला सुरुवात केली; मात्र सायंकाळी ५.३० च्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काम थांबवण्यात आले. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत काम सुरू करणे अडचणीचे आहे. 
- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, पालिका 

पुन्हा वाहतूक कोंडी
धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलावर खड्डे बुजविण्यासाठी सुरुवात करण्यात आली. या वेळी एक मालवाहू टेम्पो बंद पडल्याने वाहनचालकांना त्रास झाला. यामुळे त्या परिसरासह वालधुनी पुलावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.