रेल्वेस्थानक परिसर ‘ना वाहन क्षेत्र’!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

ठाणे - ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षा थांब्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात नवे रिक्षा थांबे तयार करणे, जुने रिक्षा थांबे हलवणे, याबाबतचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानक परिसर आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये किमान अंतरावर ‘ना वाहन क्षेत्र’ निर्माण करण्याचा आणि स्थानक परिसरातील ‘ना वाहन क्षेत्रा’त महापालिकेतर्फे मोफत शटल बस सेवा सुरू करण्याचा नवा पर्याय पुढे आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि शहरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दै.

ठाणे - ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षा थांब्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात नवे रिक्षा थांबे तयार करणे, जुने रिक्षा थांबे हलवणे, याबाबतचे नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. स्थानक परिसर आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये किमान अंतरावर ‘ना वाहन क्षेत्र’ निर्माण करण्याचा आणि स्थानक परिसरातील ‘ना वाहन क्षेत्रा’त महापालिकेतर्फे मोफत शटल बस सेवा सुरू करण्याचा नवा पर्याय पुढे आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि शहरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दै. ‘सकाळ’च्या ठाणे टुडेमध्ये ३१ मे रोजी ‘शेअरिंगच्या नावाखाली दुकानदारी’ या मथळ्याखाली याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापलिका प्रशासन आणि रिक्षा संघटनांची संयुक्त बैठक झाली.   

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस आमदार डॉ. निरंजन डावखरे, नगरसेवक नारायण पवार, मुकुंद केणी, संजय वाघुले, सुहास देसाई, पोलिस उपायुक्त (वाहतूक शाखा) संदीप पालवे, झोन- १ चे पोलिस उपायुक्त स्वामी, महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, शहर विकास नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर यांच्यासह शहरातील सर्व रिक्षा युनियनचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

बैठकीत प्रशासनाने विविध सूचना केल्या; तर रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आश्‍वासन या वेळी प्रशासनाला दिले.

बैठकीत झालेले निर्णय
रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन करावे.
वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही किंवा नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 
इतर शहरांतील रिक्षाचालकांसाठी आदर्श निर्माण करावा.
रिक्षाचालकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका, पोलिस, आरटीओ आणि रिक्षा युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब.
रिक्षाचालकांनी प्रवाशांना रस्त्याच्या मधोमध न सोडता पदपथाच्या बाजूला सोडावे.
जंक्‍शनवर रिक्षा उभी करू नये.
 
रिक्षामध्ये जीपीएस यंत्रणा
ओला आणि उबेरच्या धर्तीवर रिक्षांसाठी महापालिकेच्या माध्यमातून जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करता येईल का, याविषयी सर्व रिक्षा युनियननी यावर निर्णय घ्यावा, असे ठरविण्यात आले. तर शहरातील रिक्षाचालकांसाठी रिक्षाचालक भवन उभे करण्याबाबतही या वेळी सकारात्मक चर्चा झाली.