पाच प्रभाग समित्यांवर शिवसेना बिनविरोध 

पाच प्रभाग समित्यांवर शिवसेना बिनविरोध 

ठाणे - महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांपैकी पाच समित्यांवर शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे; तर एका प्रभाग समितीवर भाजपचा विजय निश्‍चित आहे. कळवा आणि मुंब्रा प्रभाग समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार असल्याचे मानले जात आहे; मात्र कळवा प्रभाग समितीत शिवसेनेने अर्ज दाखल केल्याने काही अंशी लढाई होणार आहे; तर नौपाडा प्रभाग समितीत शिवसेना आणि भाजपमध्ये अध्यक्षपद मिळवण्यासाठी चुरस आहे. 

महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर गेले नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक 22 नोव्हेंबरला होणार आहे. 

महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरही अद्याप महापालिकेत स्थायी समिती स्थापन करण्यात आलेली नाही. तसेच विकेंद्रीकरणासाठी अत्यावश्‍यक असलेले प्रभाग समितीचे अध्यक्षही निवडण्यात आलेले नव्हते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचे विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी 73 व्या घटना दुरुस्तीनुसार प्रभाग समितीची रचना करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात शहरातील प्रभागाची पुनर्रचना करण्यात आली. दहा प्रभाग समित्यांपैकी एक कमी करून त्या नऊ करण्यात आल्या आहेत. त्याची निवडणूक आता 22 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता महापालिकेत होणार आहे. त्यानुसार बुधवारी (ता.15) या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात आले. त्यानुसार कोपरी-नौपाडा येथे शिवसेना आणि भाजपत लढाई होणार आहे. येथे शिवसेनेतर्फे शर्मिला गायकवाड; तर भाजपतर्फे सुनेश जोशी यांनी अर्ज भरला आहे. येथे शिवसेनेचे संख्याबळ नऊ असून भाजपचे संख्याबळ सात आहे. त्यामुळे ही प्रभाग समितीही शिवसेनेच्या वाटेला जाणार हे निश्‍चित मानले जात असले, तरी येथे चमत्कार घडेल, असा विश्‍वास भाजपला आहे. 

कळव्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना 
कळव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रभाग समितीवर कब्जा करणार असली, तरी येथे शिवसेनेतर्फे पूजा करसुळे यांनी अर्ज भरला आहे; तर राष्ट्रवादीतर्फे महेश साळवी यांनी अर्ज भरला आहे. उथळसर प्रभाग समितीत मात्र भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने शिवसेनेने येथे अर्जच भरला नाही. त्यामुळे भाजपच्या नंदा पाटील यांची निवड बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com