ठाण्यात इमारतीच्या 27 व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

ठाण्यातील कापुरबावडी परिसरातील रूस्तमजी टॉवर या इमारतीच्या 27 व्या मजल्यावरून उडी घेऊन एका 37 वर्षीय महिलेने रविवारी सकाळी आत्महत्या केली.

ठाणे - ठाण्यातील कापुरबावडी परिसरातील रूस्तमजी टॉवर या इमारतीच्या 27 व्या मजल्यावरून उडी घेऊन एका 37 वर्षीय महिलेने रविवारी सकाळी आत्महत्या केली.

हेतल धिरज परमार असे या महिलेचे नाव असून आज (रविवार) सकाळी 7.45 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच कापुरबावडी पोलिसस घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.