नर्सरी संचालिकेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

ठाणे - ठाण्यातील टेकडी बंगला परिसरातील एका नर्सरीच्या संचालिकेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रद्धा लाड (वय 40) असे त्यांचे नाव आहे. पाचपाखाडी येथील टेकडी बंगला परिसरातील स्नेह रश्‍मी संकुलात त्या राहत होत्या. त्या घरातच वंडर किड्‌स नर्सरी चालवत होत्या. काल सायंकाळी घरात कोणीही नसताना श्रद्धा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्रद्धा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.