ब्रीच कॅंडीसमोरील तीन दुकाने खाक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - ब्रीच कॅंडी हॉस्पिटलसमोरील प्रेमसन्स हाउस शोरूममधील काही दुकानांना शुक्रवारी (ता. 20) दुपारी भीषण आग लागली. या आगीत तीन दुकाने खाक झाली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. भुलाबाई देसाई रोडवर ब्रीच कॅंडी हॉस्पिटलसमोर प्रेमसन्स हाउस शोरूम ही दोन मजली इमारत आहे. यामधील एका दुकानाला अचानक आग लागली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतली. काही अवधीतच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले; पण तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अखेर पाच फायर इंजिन, पाच जेटी व एक रेस्क्‍यू व्हॅनच्या साह्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर 4 वाजून 51 मिनिटांनी आग आटोक्‍यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Web Title: three shop fire loss

टॅग्स