अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्याविरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

टिटवाळा - कल्याण तालुक्‍यातील काही अंगणवाड्यांची कुलपे परस्पर तोडल्याबद्दल महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

टिटवाळा - कल्याण तालुक्‍यातील काही अंगणवाड्यांची कुलपे परस्पर तोडल्याबद्दल महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघ व कृती समितीच्या वतीने बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे अंगणवाड्यांचे कामकाज बंद आहे; परंतु प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाड्यांच्या चाव्यांची मागणी न करताच अनेक ठिकाणी कुलपे तोडण्यात आली. अंगणवाडी केंद्रात अंगणवाडीबाबत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. अशा स्थितीत कोणतेही कागदपत्र वा वस्तू गहाळ झाल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोषी न ठरविता प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे व अन्य कर्मचाऱ्यांना दोषी ठरवावे, अशी मागणी कल्याण तालुक्‍यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: titwala mumbai news anganwadi employee officer oppose complaint