police fir
police firsakal media

नवी मुंबई : कंटेनरचालकाकडून २६ लाखांच्‍या मॉनिटरचा अपहार; आरोपीविरोधात गुन्हा

नवी मुंबई : चेन्नई येथील कंटेनर तळोज्‍यात पोहोचवण्याची जबाबदारी सोपविलेल्या चालकाने कंटेनरमधील (container) तब्बल २६ लाख रुपये किमतीच्‍या डेल कंपनीच्या मॉनिटरचा अपहार (Monitor fraud) केल्याचे उघडकीस आले आहे. शमीम खुर्शीद खान (२५) असे कंटेनर चालकाचे नाव असून तळोजा पोलिसांनी (Taloja police) त्याच्या विरोधात अपहाराचा (fraud case registered) गुन्हा दाखल केला आहे.

police fir
नवी मुंबईवर १,५०० CCTV कॅमेऱ्यांची असणार नजर; खाडीकिनारी नऊ थर्मल कॅमेरे

चेन्नई येथील ब्ल्यू डार्ट कंपनीचे व्‍यवस्‍थापक रणजित कुमार यांनी ३१ मार्च रोजी चेन्नई येथून तळोज्‍यात ८०० डेल कंपनीचे मॉनिटरने भरलेले बॉक्स व २६ इतर मॉनिटरचे बॉक्स पोहोचविण्याची जबाबदारी सेंच्युरी कार्गो कॅरिअर प्रा.लि. या कंपनीच्या चेन्नई येथील कार्यालयाला दिली होती.

कार्गो कंपनीने शौकीन सनाब खुर्शीद खान या कंटेनर चालकाला ३२ फुटी ट्रेलरमध्ये मॉनिटरचे बॉक्स भरून तळोज्‍यात पोहोचविण्यास सांगितले होते. मात्र कंटेनरवर शौकीन हा चालक म्हणून न जाता, त्याने त्याचा भाऊ शमीम खान याला पाठवून दिले. १ एप्रिल रोजी सायंकाळी कंटेनरमध्ये बॉक्स भरल्यानंतर शमीम तळोज्‍यात जाण्यासाठी निघाला होता. मात्र त्याने कंटेनरमधील मॉनिटर बाहेर काढून अपहार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com