बदल्यांच्या धोरणाला शिक्षकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबई - मुंबईतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना यंदापासूनच सुधारित धोरणानुसार सुरवात होणार आहे; परंतु या बदल्यांना राज्यातील शिक्षकांचा विरोध असल्याने याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बदल्यांचे नवे धोरण 27 फेब्रुवारीला मंजूर झाले. त्याची अंमलबजावणी 31 मेपर्यंत होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षे गावाजवळच्या शाळेतील शिक्षकांची पंचाईत होणार आहे. बदलीच्या नव्या धोरणानुसार शाळांची विभागणी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्रात करण्यात येत आहे. अवघड क्षेत्रातील शाळांत तीन वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या शिक्षकांना सर्वसाधारण शाळांमध्ये बदली मिळणार आहे. त्यामुळे सर्वसाधारण शाळांत दहा वर्षे सेवा केलेल्या शिक्षकांना अवघड क्षेत्रात जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.