परिवहन समिती सभापतिपदी शिवसेनेचे संजय पावशे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदी सोमवारी (ता. 3) शिवसेनेच्या संजय पावशे यांची बिनविरोध निवड झाली. बुधवारी (ता. 5) या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येईल. पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांचीही एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली. 13 सदस्यांच्या परिवहन समितीत शिवसेना सहा, भाजप पाच, तर कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येकी एक-एक असे बलाबल आहे. या वेळी सभापतिपद भाजपकडे जाण्याची शक्‍यता होती; मात्र त्यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद दिल्याने परिवहन समिती सभापतिपद शिवसेनेने स्वतःकडे ठेवले.

कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन समिती सभापतिपदी सोमवारी (ता. 3) शिवसेनेच्या संजय पावशे यांची बिनविरोध निवड झाली. बुधवारी (ता. 5) या संदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येईल. पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापतिपदी माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांचीही एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली. 13 सदस्यांच्या परिवहन समितीत शिवसेना सहा, भाजप पाच, तर कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येकी एक-एक असे बलाबल आहे. या वेळी सभापतिपद भाजपकडे जाण्याची शक्‍यता होती; मात्र त्यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद दिल्याने परिवहन समिती सभापतिपद शिवसेनेने स्वतःकडे ठेवले. ज्येष्ठ नगरसेविका, तसेच माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी आज शिक्षण समिती सभापतिपदासाठी अर्ज भरला. या पदासाठी एकच अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.