दोन दिवसांत दोन यकृत, चार मूत्रपिंडे, एका हृदयाचे दान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

मुंबई - हिरानंदानी रुग्णालयातील किडनी "रॅकेट‘ उघडकीस आल्यानंतर अवयव प्रत्यारोपणाबाबत पुन्हा प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, लागोपाठ दोन दिवस झालेल्या अवयवदानानंतर शंकेचे मळभ काहीसे दूर झाले आहे. मुंबईत शुक्रवारी आणि शनिवारी रात्री दोन यकृत, चार मूत्रपिंडे आणि एका हृदयाचे दान झाले. 

धीरुभाई अंबानी रुग्णालयात शनिवारी (ता. 23) रात्री हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडांचे दान झाले. त्यापैकी यकृत अंबानी रुग्णालयातील 43 वर्षांच्या पुरुषाला, तर हृदय फोर्टिस रुग्णालयातील 25 वर्षांच्या तरुणीला देण्यात आले. जसलोक रुग्णालयात दाखल असलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाला एक मूत्रपिंड, तर दुसरे मूत्रपिंड 15 वर्षांच्या मुलीला बसवण्यात आले. हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी (ता. 22) रात्री झालेल्या अवयवदानात दोन मूत्रपिंडे आणि एका यकृताचे दान झाले.

अवयवदान महादान
जानेवारी ते 24 जुलै
दाते : 34
मूत्रपिंड : 56
यकृत : 32
हृदय : 18 

मुंबई

मुंबई - शीना बोरा हत्याप्रकरणी कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीलाही मारहाण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे....

11.51 AM

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील मनसेच्या संघटनात्मक फेरबदलाच्या बैठकांचे नियोजित वेळापत्रक पूर्ण होण्यापूर्वीच...

10.24 AM

ठाणे - पावसाळा सुरु झाल्याने ठाण्यात साथीच्या रोगांनी डोके वर काढले असून, ठाण्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ...

09.51 AM