डोंबिवलीमधील दोन तरुणांनी लोकल समोर येऊन केली आत्महत्या

दोन दिवसांत घडल्या दोन घटना
local train
local trainSakal

डोंबिवली - घरातील किरकोळ वादातून डोंबिवलीतील दोन 18 वर्षीय तरुणांनी लोकल समोर येत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांत दोन तरुणांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने पालकांनी थोडं सजग रहावे असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

डोंबिवलीत राहणाऱ्या दोन तरुणांनी दोन दिवसांत लोकल समोर येत आत्महत्या केली आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल श्रीकांत ओहल (वय 18) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेतील आयरेगाव समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निखिलने गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकल समोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. लोकलच्या मोटरमनने याविषयी माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधकांना दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेपूर्वी बुधवारी कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने कोपर ते दिवा स्थानका दरम्यान ट्रॅकवर चालत जाऊन आणि लोकल समोर जाऊन आत्महत्या केली आहे. बुधवारी सकाळी 11.15 च्या सुमारास ही घटना घडली. करण अर्जुन शेट्टी (वय 18) असे मृत तरुणाचे नाव आहे. शेट्टी याचे वडिलांसोबत भाडणं झाले होते. या रागातून त्याने आत्महत्या केल्याचे लोहमार्ग पोलिस यांनी सांगितले.

डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन दिवसांत दोन 18 वर्षीय तरुणांनी आत्महत्या केली आहे. घरातील किरकोळ वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले आहे. आजची तरुण पिढी ही छोट्या छोट्या वादातून टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून त्याकडे लक्ष दिले पाहिजे व अशा घटना रोखण्यास पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.

- मुकेश ढगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com