गटातटावरून ठिणगीची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

उल्हासनगर -  पालिकेत एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न भंगले तरी साई पक्षाच्या मदतीने भाजप सत्ता स्थापन करणार आहे. शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी गट, ओमी कलानी गट आणि साई पक्षाच्या जीवन इदनानी यांच्या गटात भविष्यात पदांच्या वाटपावरून ठिणगी पेटण्याची शक्‍यता आहे.

उल्हासनगर -  पालिकेत एकहाती सत्ता आणण्याचे स्वप्न भंगले तरी साई पक्षाच्या मदतीने भाजप सत्ता स्थापन करणार आहे. शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी गट, ओमी कलानी गट आणि साई पक्षाच्या जीवन इदनानी यांच्या गटात भविष्यात पदांच्या वाटपावरून ठिणगी पेटण्याची शक्‍यता आहे.

ओमी यांच्या पत्नी पंचम कलानी, कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी यांची नावे आघाडीवर आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी कलानी आणि आयलानी गटात चुरस आहे. मागील निवडणुकीत सात जागांवर विजयी झालेल्या साई पक्षाने पाठिंबा देण्याच्या बदल्यात अडीच वर्ष महापौरपदाची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना महापौरपद देण्यातही आले होते; मात्र कालावधी संपूनही साई पक्षाच्या आशा इदनानी या महापौरपद सोडत नसल्याने शिवसेना आणि साई पक्षाचा वाद विकोपाला गेला होता. त्यामुळे यंदा मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपसोबत नांदतानाही साई पक्ष भविष्यात कोणकोणते वेगळे रंग दाखवणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आव्हान भाजपपुढे
कलानी आणि आयलानी हे दोन्ही गट पक्षांतर्गत आपले वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. साई पक्षाचा भाव वधारल्याने भविष्यात त्यांच्या मागण्याही वाढण्याची शक्‍यता आहे. गटातटाचे राजकारण आणि दुसरीकडे साई पक्षाच्या मागण्या या बाबी हाताळून पालिकेचे कामकाज चालवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.

मुंबई

नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे...

04.33 AM

नवी मुंबई - वाशी रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी महिलांकडून तीन रुपये घेतले जात आहेत. यामुळे महिलांमध्ये...

04.03 AM

बेलापूर - जुईनगर सेक्‍टर २२ मधील रेल्वे वसाहतीत डेंगीचे १२ संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर नेरूळमधील डॉ. डी. वाय....

03.45 AM