वसुली नाही; पगार नाही

दिनेश गोगी
गुरुवार, 27 जुलै 2017

उल्हासनगर - आठवड्याला ५० लाख रुपये टॅक्‍सवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेल्या मालमत्ता कर विभागातील १९ अधिकाऱ्यांचा जुलैचा पगार थांबवण्यात आला आहे. यात ४ निरीक्षक आणि १५ लिपिकांना ही शिक्षा मिळाली आहे. त्यांचा जुलैचा पगार काढू नये अशा सूचना आयुक्त राजेंद्र निंबाळकर, करनिर्धारक व संकलक युवराज भदाणे यांनी मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना दिल्या आहेत.

उल्हासनगर - आठवड्याला ५० लाख रुपये टॅक्‍सवसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेल्या मालमत्ता कर विभागातील १९ अधिकाऱ्यांचा जुलैचा पगार थांबवण्यात आला आहे. यात ४ निरीक्षक आणि १५ लिपिकांना ही शिक्षा मिळाली आहे. त्यांचा जुलैचा पगार काढू नये अशा सूचना आयुक्त राजेंद्र निंबाळकर, करनिर्धारक व संकलक युवराज भदाणे यांनी मुख्य लेखाधिकारी दादा पाटील यांना दिल्या आहेत.

कायद्याच्या अधीन राहून सडेतोड निर्णय घेण्यात तरबेज असलेले जनसंपर्क अधिकारी यांच्याकडे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी करनिर्धारक व संकलक पद सोपवले आहे. तेव्हापासून मालमत्ता कर वसुलीसाठी टोकाचे निर्णय घेत युवराज भदाणे यांनी रिव्हर्स ट्रॅप करून एकाला पैसे देताना पकडून दिले आहे. 

मालमत्ता कराची वसुली तेजीत व्हावी यासाठी निंबाळकर, भदाणे यांनी निरीक्षक आणि लिपिकांना युनिटनिहाय आठवड्याला ५० लाख रुपये वसुलीचे लक्ष्य दिले होते; मात्र याच्या समीपही अधिकारी गेले नसल्याची आकडेवारी समोर आल्यावर बुधवारी (ता. २६) सकाळी राजेंद्र निंबाळकर, युवराज भदाणे यांची बैठक झाली. यात त्यांनी निरीक्षक आणि लिपिक अशा १९ अधिकाऱ्यांचा ऑगस्टचा पगार थांबवण्याचा निर्णय घेतला. तशा सूचना मुख्य लेखाधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यांना मिळाली शिक्षा...
करनिरीक्षक ः उषा मौळे, सुखदेव भंबानी, नारायण कुडिया, आनंद भानुशाली, लिपिक ः दिनेश मरोठिया, अनिल तलरेजा, हरेश केवलानी, दिलीप शिंदे, पी. ओ. पाटील, सुनील वझीराणी, संजय मुकणे, संदीप सिरस्वाल, चंदर बेलानी, महेश वालानी, गौरव सहाणे, दयाराम डोभाळे, रवींद्र दंडगव्हाळ, महेश बदलानी, जयराम खंडवी. यांना ३५ ते ४० हजार रुपये पगार मिळणार नसल्याने ते हवालदिल झाले आहेत.

कारवाईच्या आधी अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्यानंतर फुल देऊन त्यांना पुन्हा आवाहन करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी लक्ष न घातल्याने पंगार थांबवला आहे. यानंतर त्यांनी लक्ष्य न गाठल्यास कायमस्वरूपी वेतन रोखले जाईल.
- युवराज भदाणे,  करनिर्धारक व संकलक

मुंबई

तुर्भे  - दगडखाणींमुळे प्रदूषणात 10 टक्के वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना श्‍वसनविकारांचा सामना करावा लागत आहे. याच...

05.33 AM

तुर्भे  - 17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा जवळ आल्याने सायन-पनवेल महामार्गाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभीकरणाचे...

05.03 AM

मुंबई -  अवजड वाहनांचा वापर करून कुलाबा-सीप्झदरम्यानच्या "मेट्रो-3' प्रकल्पाचे काम रात्रीच्या वेळेस करण्यास केलेली मनाई...

04.24 AM