वांद्रे-वर्सोवासाठी सागरी सेतूला परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - वांद्रे-वरळी सागरी सेतू उभारल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या प्रकल्पाच्या विस्ताराकडे लक्ष दिले आहे. वर्सोवा-वांद्रे या प्रस्तावित सागरी सेतूला पर्यावरण विभागाकडून परवानगी मिळाली असून लवकरच त्यासाठी निविदा मागवण्यात येणार आहेत.

या प्रकल्पामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील ताण कमी होऊन उपनगरातील वाहतूक अधिक सुसाट होणार आहे. शहर आणि उपनगरात होणारी वाहनांची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वांद्रे-वर्सोवा हा 9.89 कि.मी.चा सागरी सेतू उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सात हजार 502 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाला राज्यस्तरीय पर्यावरण प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यामुळे पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल, असा विश्‍वास "एमएसआरडीसी'चे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी सांगितले.

Web Title: vandre-varsova sea bridge permission