विधान परिषद दिवसभरसाठी तहकूब

महेश पांचाळ
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर बाराव्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज 12 वाजता सुरू झाल्यानंतर विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे अवघ्या मिनिटामध्ये तहकूब झाले.

काल (गुरुवार) शेतकऱ्याला मंत्रालयात झालेली मारहाण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारानी 'वेल'मध्ये येऊन जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सभापतींनी एका मिनिटात दिवसभरासाठी  तहकूब केले.

लाखाच्या पोशिंद्याला न्याय मिळावा ही रास्त मागणी घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत आहोत. असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. त्यात न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मंत्रालयात मारहाण होते ही  खेदजनक बाब आहे. असे मुंडे म्हणाले

Web Title: vidhan parishad adjourned for the day