प्रभाग समित्यांसाठी शिवसेना-भाजप एकत्र 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

मुंबई, - मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांसाठी शिवेसना-भाजपने अखेरीस युती केली आहे. त्यामुळे समित्यांच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून कॉंग्रेस हद्दपार झाली आहे. शिवसेना-भाजप वगळता अन्य पक्षांच्या वाट्याला अध्यक्षपदही येण्याची शक्‍यता नाही. 

महापालिकेच्या 17 प्रभागांपैकी फक्त ए, बी आणि ई या प्रभाग समितीत कॉंग्रेसचे वर्चस्व होते, तर एल प्रभागात मनसेचे तीन नगरसेवक महत्त्वाची भूमिका बजावणार होते. एम पूर्व प्रभागात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी पक्ष आणि एमआयएम एकत्र आले असते, तर या समितीवरील शिवसेनेचे वर्चस्व संपुष्टात आले असते. आता प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपने एकमेकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकही प्रभाग समिती या दोन पक्षांव्यतिरिक्त अन्य पक्षाला मिळणार नाही. भाजपच्या वाटेला या वेळी नऊ आणि शिवसेनेच्या वाटेला आठ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद येणार आहे. 

Web Title: Ward committees for the Shiv Sena-BJP together