पश्‍चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक

Megablock
Megablock

मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची देखभाल या कामांसाठी रविवारी पश्‍चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक, तर मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेवर बोरिवली ते नायगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशांकडील जलद मार्गावर जम्बोब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड मार्गावर, तर हार्बरवर सीएसटीएम ते चुनाभट्टी, वांद्रे या मार्गावर मेगाब्लॉक असेल. त्या दृष्टीने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच हार्बर मार्गावर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्‍चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत घेण्यात येणाऱ्या जम्बोब्लॉकदरम्यान चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या विरार, वसई ते बोरिवली आणि बोरिवली ते वसईदरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत; तर मध्य रेल्वेवर सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. मुलुंडकडे जाणाऱ्या जलद-अर्धजलद गाड्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे त्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ब्लॉकदरम्यान सीएसएमटी दादर येथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान कल्याणच्या दिशेला धीम्या मार्गावर धावतील. हार्बरवर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत पश्‍चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

हार्बर मार्गावर अनेक गाड्या रद्द
हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रेच्या डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी, वांद्रे-सीएसएमटी मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत आणि सीएसएमटी, वडाळा येथून वाशी, बेलापूर, पनवेलला रवाना होणाऱ्या सर्व गाड्या सकाळी ११.३४ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत, तसेच सीएसएमटी येथून वांद्रे, अंधेरी, गोरेगावला सुटणाऱ्या गाड्या सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीला रवाना होणाऱ्या सर्व गाड्या सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत, अंधेरी, वांद्रे, गोरेगाव येथून सीएसएमटीला रवाना होणाऱ्या गाड्या १०.४५ ते सायंकाळी ४.५८ पर्यंत रद्द राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com