मनोर : महागावमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; चारही आरोपींना अटक

gang Rape crime
gang Rape crimesakal media

मनोर : बोईसर पूर्वेकडील महागाव ग्रामपंचायत (Mahagaon) हद्दीत एका तरुणीवर सामूहिक अत्याचार (Gang rape) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणी आपल्या भावी पतीसोबत रात्रीच्यावेळी तरुणाच्या घरी परतल्यानंतर तिचे अपहरण (kidnapping) करण्यात आले होते. या प्रकरणी बोईसर पोलिसांत (boisar police) गुन्हा दाखल असून चारही (four culprit arrested) आरोपींना अटक करण्यात आली.

gang Rape crime
"बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी समित्या आणि भरारी पथकांची व्याप्ती वाढवणार"

बोईसर पूर्वेकडील महागावातील तरुण आपल्या भावी पत्नीसह रविवारी (ता. ६) एका लग्नसमारंभासाठी गेला होता. रात्री परत आल्यानंतर घराबाहेर तिला ठेऊन कामानिमित्त तरुण घरात गेला होता. काही वेळाने घराबाहेर आल्यावर त्याला ती तरुणी दिसली नाही. त्यामुळे त्याने परिसरात शोधाशोध सुरू केला. तासाभराने तरुणी त्याला सापडली आणि तिने बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिली.

आरोपींना पोलिस कोठडी

घराबाहेर उभी असताना चार तरुणांनी तिचे तोंड दाबून अपहरण करून तिला एक किलोमीटर अंतरावर निर्जनस्थळी घेऊन गेले होते. त्या ठिकाणी चौघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी पळ काढला, असे तिने सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. बोईसर पोलिसांनी काही तासांतच आरोपींना अटक केली. न्यायालयाने चारही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com