लेखकाच्याही सामाजिक जबाबदाऱ्या - रामचंद्रन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

मुंबई - लेखन केवळ स्वांतसुखाय नाही, तर ते करणाऱ्या लेखकाच्या काही सामाजिक जबाबदाऱ्या असतात, असे मत प्रसिद्ध कन्नड साहित्यिक सी. एन. रामचंद्रन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट आणि मैसूर असोसिएशनच्या वतीने माटुंगा येथे झालेल्या आठव्या आंतरभारती साहित्य संवादात ते बोलत होते. कन्नड आणि मराठी भाषेतील पौराणिक संदर्भ मांडताना लेखक म्हणून सामाजिक जबाबदाऱ्याही रामचंद्रन यांनी मांडल्या. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, मैसूर असोसिएशनच्या अध्यक्ष के. कमला, आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्ष पुष्पा भावे, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अध्यक्ष नीरजा उपस्थित होत्या. "अस्वस्थ जगत' ही साहित्य संवादाची थीम होती. या वेळी 55 कन्नड पुस्तके मराठीत भाषांतर केलेल्या उमा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.