रामदेवबाबा राज ठाकरेंच्या भेटीला; अमितला योगाचे धडे

सुचिता रहाटे
बुधवार, 17 मे 2017

पतंजली या आपल्या ब्रँडमुळे नावारूपाला आलेले योगगुरू रामदेव बाबा यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना ते योगाचे धडे देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई - योगगुरू रामदेवबाबा यांनी आज (बुधवार) सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. 

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीचे नेमके कारण कळू शकले नसले तरी भेट वैयक्तिक असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असले तरी रामदेवबाबांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. रामदेवबाबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली आहे.

पतंजली या आपल्या ब्रँडमुळे नावारूपाला आलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना ते योगाचे धडे देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अमित ठाकरे हे आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे राज ठाकरे देखील पक्ष पातळीवर जास्त कार्यरत नव्हते. तसेच उपचारासाठी राज अमितला घेऊन परदेशी गेले होते.