अमेरिकेत साडेचार वर्षांच्या चिमुरडीचे संस्कृत पाठांतर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

मराठी नववर्षानिमित्त अमेरिकेतील कनेक्‍टिकट महाराष्ट्र मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वरा संतोष कायंदे या साडेचार वर्षांच्या चिमुरडीने भगवतगीतेचा पंधरावा अध्याय सादर केला. ""परदेशात असूनही स्वराचे उच्चार अत्यंत स्पष्ट होते. आपली संस्कृती जोपासण्याचे हे उत्तम उदाहरण आहे,'' असे कनेक्‍टिकट महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशय साठे यांनी सांगितले. स्वराने यापूर्वी अडीच वर्षांची असताना पसायदान मुखोद्गत करून सादर केले होते. इतक्‍या लहान वयात तिचे असणारे स्पष्ट उच्चार आणि पाठांतर हे खरोखर कौतुकास्पद आहे.
वारकरी घराण्याचा वारसा लाभलेली स्वरा ही मूळची बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव-राजा तालुक्‍यातील उंबरखेडमध्ये या लहान गावात राहात होती. स्वराचे वडील 2007 पासून अमेरिकेत हार्टफोर्ड, कनेक्‍टिकट येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस आहेत. स्वराला हा वारसा तिच्या आईकडून मिळाला. विश्वशांती केंद्र आळंदी आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे माजी समन्वयक स्व.अंगद भिकाजी केंद्रे स्वराचे आजोबा असून ते यांचे प्रेरणास्थान आहेत. "माईर्स MIT' पुणेचे संस्थापक आणि विश्वशांती केंद्र आळंदीचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद लाभले.

 

व्हिडीओ गॅलरी