सांगवडे नृसिंह मंदिरात गर्दी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

सांगवडेवाडी - सांगवडे (ता. करवीर) येथील श्री नृसिंह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली. बुधवारी मंदिरात गरुडावर बसलेली नृसिंह पूजा शिवप्रसाद गुरव, योगेश रावळ, महेश गुरव यांनी बांधली. दरोज मंदिरात विविध रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात येत आहे. 

सोमवार, अमावस्या, नवरात्र, श्रावणात होणारी गर्दी लक्षात घेऊन श्री नृसिंह देव-देवस्थान ट्रस्टतर्फे मंदिराजवळ काही बदल तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घेतल्याने येणाऱ्या भाविकांना केवळ मुखदर्शन नव्हे, तर पूर्ण मूर्तीचे दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. ग्रीलचा वापर केल्याने मंदिरात सुरक्षित शिस्त लागल्याचे जाणवते. पार्किंगसाठी मंदिरासमोर सांगवडेवाडी रस्त्यावर दुतर्फा मुरूम टाकून पार्किंगची व्यवस्था आहे.

सध्या ती अपुरी पडत असल्याने आणखी पुढे वाढविणे गरजेचे आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले आहे. पहाटे पूजा, सकाळी साडेनऊला आरती, रात्री साडेनऊ वाजता आरती व पालखी सोहळा साजरा होतो.

टॅग्स