मिरजेत 400 वर्षांची बळीची प्रथा टाळून कोहळा अर्पण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

मिरज -  मिरजेच्या श्री अंबाबाई मंदिरात मेंढीचा बळी देण्याच्या चारशे वर्षांच्या परंपरेला शुक्रवारी खंड पडला. देवीच्या दारात कोहळा कापण्यात आला; देवीला नैवेद्य दाखवून भाविकांना तीर्थप्रसाद दिला. यावेळी उपस्थित असणारे शेकडो भाविक एका नव्या परंपरेचे साक्षीदार ठरले. 

अंबाबाई मंदिरात दुर्गाष्टमीच्या रात्री मेंढीचा बळी देण्याची परंपरा चारशे वर्षांपासून सुरु होती. बदलत्या काळात ती कालबाह्य आणि अनुचित ठरु लागल्याने बळी बंद करण्याचा निर्णय विश्‍वस्त मंडळाने घेतला. त्याचे जोरदार स्वागत मिरजकर नागरीकांनी आणि भाविकांनी केले. नव्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी गुरुवारी मध्यरात्री झाली. मंदिराचे मानकरी कोडोलीकर यांच्या हस्ते कोहळा कापला. त्याचा कुुंकुमिश्रीत तिलक देवीच्या कपाळी लावला. भाविकांनी देवीचा जयघोष केला. पुरोगामी मिरजकरांनी भक्तीच्या नावाखाली एका निष्पाप जीवाचा बळी जाणे थांबवले. 

Web Title: sangli news 400 years tradition breaks

टॅग्स