चांदोली धरणातून २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

chandoli
chandoli

वारणावती : चांदोली धरण परिसरात सलग चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. पाण्याने सांडवा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने सकाळी दहा वाजता धरणाचे चारही वक्राकार दरवाजे ०.५०  मीटर उचलून २१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला आहे. त्याच बरोबर वीजनिर्मिती केंद्रातून  ५९२ व  उच्च स्तर द्वारातून ८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सर्व मिळून मिळून ३४९२  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.

पाऊसाची संतत धार सुरू असून धरणातून सुरू केलेला विसर्ग वीजनिर्मिती केंद्रातून येणारे पाणी यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. दरम्यान पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासना मार्फत देण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४५ दिवस म्हणजे दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे .गतवर्षी आजच्या तारखेला ८१० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण १३२४ मिलीमीटर इतके आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५१४ मिलिमीटर पाऊस अधिक झाला आहे .
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com