वारणा धरणात 29.28 टीएमसी पाणी साठा

29.28 TMC water in warna dam
29.28 TMC water in warna dam

सांगली - जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 29.28 टी.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात 76.08 टी.एम.सी इतका पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आजही संततधार आहे. जिल्ह्यात काल दिवसभरात सरासरी 18.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी आहे. शहरातून धोम धरणात 7.63 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 6.99 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 19.85 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 आणि राधानगरी धरणात 7.41 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी. आहे.

त्याचबरोबर, अलमट्टी धरणात 107.72 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. आहे. सांडवा, कालवा व विद्युत गृहाद्वारे वारणा धरणातून पाण्याचा एकूण 13 हजार 885 क्‍युसेक्‍स तर कोयना धरणातून कालवा व विद्युतगृहाद्वारे 2 हजार 100 क्‍युसेक्‍स इतका विसर्ग सुरू आहे.

कालपासून आज सकाळपर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी अशीः मिरज 25.7, जत 4.6, खानापूर-विटा 12, वाळवा-इस्लामपूर 20.6, तासगाव 11.5, शिराळा 59, कवठेमहांकाळ 6.6, पलूस 21.4 आणि कडेगाव 25.4 मि.मी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com