‘सुरक्षित मातृत्वा’साठी साडेतीन कोटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

सातारा - पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात सातारा जिल्हा परिषदेने किमया केली आहे. खासगी स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेला सहभागी करत या योजनेचा लाभ देण्यात राज्यात प्रथम स्थान मिळविले. योजनेत सध्या १८ हजार ६५७ गर्भवती महिलांची नोंदणी झाली आहे, तर आजवर २२ हजार ३०३ महिलांना तीन कोटी ६१ लाखांची मदत दिली आहे. 

ही योजना राबविताना जिल्हा परिषद प्रशासनाने खासगी स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेला सोबत घेतले. जिल्ह्यातील ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला खासगी स्त्रीरोग तज्ज्ञ तपासणीसाठी जातात. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात सहा हजार ५९६ गर्भवती महिलांची, तर आजवर एकूण ३० हजार गर्भवती महिलांची तपासणी झाली. या सामाजिक लोकसहभागाचा दृश्‍य परिणाम जिल्ह्यात दिसू लागलाय. ‘पीएचसी’मध्ये तपासणीस येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या वाढली आहे. 

या अभियानात २०१७-१८ मध्ये गर्भवती महिलांची ऑनलाइन नोंदणी करण्यात सातारा जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. १८ हजार ६५७ लाभार्थ्यांची नोंदणी केली आहे. 

योजनेतून एकूण ४१ हजार ४२८ अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील २२ हजार ३०३ अर्जदारांना निधी प्राप्त झाला आहे. अद्यापही १३ हजार ७३७ अर्जदार पात्र असून, त्यासाठी मदत मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

30451 - अभियातून तपासणी
27384 - हिमोग्लोबिन तपासणी
870 - जोखमीच्या गर्भवती महिला
482 - रक्‍तक्षयग्रस्त
98 - मधुमेहग्रस्त

Web Title: 3.5 crore for mother security satara zp