आंदोलनामुळे चार दिवसात 67 लाख लिटरवर दूध संकलन घटले  

milk
milk

कऱ्हाड : दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकाररेल्या आंदोलनाची धग गावोगावी पोचल्याने आंदोलनाला चांगले यश मिळाले. त्यामुळे सहकारी व खासगी दुध संघाचे संकलन गेल्या चार दिवसात घटले सातारा जिल्ह्यात चार दिवसात तब्बल 67 लाख 20 हजार लिटरवर दुध संकलन झाले नाही. त्यामुळे सुमारे 12 कोटी 76 लाख 91 हजार 400 रुपयांचे नुकसान संघ व संस्थांना सोसावे लागुन दुध व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. 

पाण्याच्या बाटलीपेक्षाही दुधाच्या एक लिटरची किंमत कमी झाल्याने शेतक्यांच्या हाडाची काड झाली तरीही त्यांना दुध धंदा परवड नाही असे सांगुण दुधाला प्रतिलीटर पाच रुपये मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासुन खासदार राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दुधदराचे आंदोलन सुरु केले आहे. त्यासाठी महिन्यापासुन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गावोगावी बैठक घेवुन शेतकऱ्यांत जागृती केली होती. आंदोलन सुरु झाल्यापासुन गावागावातुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांनीही दुधाला चार पैसे जादा मिळतील या आशेने आंदोलनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक दुध संघांनीही या आंदोलनाला पाठिंबा म्हणुन एक दिवस संकलन बंद ठेवले होते. आंदोलनामुळे मात्र सहकारी दुध संघ आणि खासगी दुध डेअरींकडे येणाऱ्या दुधामध्ये मोठी घट झाली आहे. दुध संघाकडे सोमवारी 15.33 टक्के, मंगळवारी 21.92 टक्के, बुधवारी 28.48 टक्के दुधाचे संकलन झाले. त्यामुळे लाखो लिटर दुधाची आवकच संघाकडे झाली नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान संघांना सोसावे लागले आहे.

घटलेल्या दूध संकलनाची स्थिती -

- रोजचे दुध संकलन - सरासरी 25 लाख 82 हजार 800 लीटर  
- सोमवारी (ता.16) न झालेले संकलन ः 13 लाख 77 हजार 200 लिटर 
- मंगळवारी (ता.17) न झालेले संकलन ः 20 लाख 16 हजार 700 लिटर 
- बुधवारी (ता.18) न झालेले संकलन ः 19 लाख 58 हजार 500 लिटर 
- गुरुवारी सकाळी (ता.19) न झालेले संकलन ः 13 लाख 68 हजार 200 लिटर 
- दुधाची अंदाजे किंमत ः सुमारे 12 कोटी 76 लाख 91 हजार 400 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com