नगर-सोलापूर मार्गावर अपघातात पाच जण ठार 

accident
accident

कर्जत : नगर-सोलापूर मार्गावर तालुक्यातील पाटेवाडी शिवारात आज (रविवार) पहाटे झालेल्या ट्रक आणि जीपच्या धडकेत पाच जण जागीच ठार झाले, तर एक शालेय विद्यार्थी आश्चर्य कारक बचावला आहे. हे सर्व खरवंडी ता नेवासा येथील रहिवाशी आहेत.

याबाबत सविस्तर असे, की आज पहाटे साडे पाचच्या सुमारास पंढरपुरवरुन नगरकडे जाणारी जीप (MH12 HZ 2953) आणि समोरून येणाऱ्या सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक (AP 02 TA7929) ची समोरासमोर धड़क झाली. यात जीपमधील पाच जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या अपघातात रमेश भाऊसाहेब कातोरे व द्रोपदाबाई भाऊसाहेब कातोरे हे माय लेक व बाबासाहेब माळवदे हे जागीच ठार झाले आहेत. तर सत्यम रमेश कातोरे (वय 16) हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास अधिक उपचारसाठी जामखेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (दोन मृतांची ओळख पटली नाही, नावे समजली नाहीत) यात मयत झालेली द्रोपदा बाई या पायी दिंडी सोहळ्यात पंढरपुर येथे गेल्या होत्या. त्यांना रात्री तेथेच पॅरालायसिस चा झटका आला त्यांना आणण्यासाठी जामखेड तालुक्यात शिक्षक असलेला मुलगा रमेश गाडी घेऊन गेला होता, मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com