आधार कार्ड नोंदणी, दुरुस्तीत एजंटाकडून घोळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

कोल्हापूर - गंगावेशेतील एक आधार कार्डाचे केंद्र. या ठिकाणी एक जण आधार कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी गेले. त्यासाठी आवश्‍यक कागदपत्रेही दिली. हातांच्या ठशांचे स्कॅनही झाले. आधार कार्ड चालवणाऱ्या एजंटांच्या हाताच्या ठसे देण्याचा प्रश्‍न आला तर चक्क त्या ठशांचा शिक्का काढून तो स्कॅन करून लावण्यात आला. झाले काम.. आधार कार्डाचे काम कसे सुरू झाले, त्याचे आज समोर आलेले हे उदाहरण.. 

आधार कार्ड हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला असून आधार कार्डाशी संबंधित प्रत्येक गोष्टी जोडण्याचे काम सुरू आहे. बॅंक खात्यापासून अनेक गोष्टी यावर अवलंबून असणार आहेत; परंतु आधार कार्ड काढण्याची किंवा त्यात बदल करण्याची ही पद्धत पाहिल्यावर त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर येत आहे. 

सध्या विविध ठिकाणी आधार कार्ड केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नागरिकांच्या सोयीनुसार नवीन आधार कार्ड काढणे किंवा त्यात बदल करण्याचे काम केले जाते. गंगावेश भाजी मंडईजवळ एक आधार कार्डाचे केंद्र आहे. या ठिकाणी आज एक व्यक्ती आधार कार्डातील दुरुस्ती करण्यासाठी गेली होती. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी अनुभव कथन केला. या ठिकाणी आधार कार्डाच्या कामासाठी गेल्यावर त्यांनी आवश्‍यक ती कागदपत्रे घेतली. त्यानंतर हाताचे ठसेही घेतले. त्यानंतर एजंट असलेल्यांच्या हाताचे ठसे आवश्‍यक असताना तिथे चक्क हाताच्या ठशांचे स्कॅन करून ठेवलेला ठसा वापरण्यात आल्याचे सांगितले. ही बाब धक्कादायक असून याची गंभीर नोंद घेण्याची गरज आहे.

Web Title: aadhar card registration jumble

टॅग्स