आसबेवाडी गावात मद्यपींचा धुमाकूळ

महेश पाटील
रविवार, 15 जुलै 2018

सलगर (सोलापूर) : हुलजंती औट पोस्टच्या आखत्यारित असलेल्या आसबेवाडी गावात मद्यपींनी धुमाकूळ घातला असून यांच्या त्रासामुळे गावातून फिरणे देखील मुश्किल झाले आहे. पोलिस पाटलांकडून माहिती घेवून पोलिसांनी कारवाई करावी मागणी ग्रामपंचायत ठरावा व्दारे केली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या गावात एकजुटीचं काम चांगले झाले पण मद्यपी लोकामुळे यास गालबोट लागत आहे.

तालुक्याच्या सिमावर्ती भागात असलेल्या या गावात अवैध धंदे जोमाने सुरू असून पोलिसांची कारवाई होणार असल्याची सुचना अगोदर मिळत असल्याने विक्रेते सापडत नाहीत त्यामुळे त्याचे धंदे जोरात चालू आहेत. आसबेवाडी येथे मे महिन्यात गाव दारुबंदीचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता. या ठरावात गावातील अनेकांचे संसार विस्कळीत होवून वादळाचे प्रसंग घडू लागले. दारू आरोग्यास अपायकारक आणि आर्थिक नुकसान होत असल्याने गावात दारु बंदी करावी असा आग्रह गावातील महिलांनी ग्रामसभेत केला.

महिलांच्या रेटयाने दारु बंदी ठराव मंजुर झाला त्यावेळी पोलिस स्टेशनला तोंडी विनंती करण्यात आली होती. यात दारु विक्री रोखण्यासाठी कड़क उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा केली होती. मात्र पोलिस प्रशासनाने याकडे गांभिर्याने न पाहिल्याने खुले आम दारुविक्री सुरु असून यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या याबाबत १४ जुलैला पोलिस स्टेशनला लेखी तक्रार आणि ग्राम पंचायतीच्या ठरावाची प्रत देण्यात आली. गावातील पोलिस पाटीलाकडून दारु विक्रीला समर्थन असल्याने अवैध दारु विक्री खुलेआम सुरु असल्याची ओरड महिलातून होत आहे.

Web Title: Aasbewadi village in problem due to drunk people