रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटचा पदग्रहण सोहळा उत्साहात

rotary club.jpg
rotary club.jpg

अक्कलकोट : ' बी द इन्स्पिरेशन ' हे ब्रीद यावर्षी अंगिकरून चालू वर्षी वाटचाल करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटच्या २०१८ - १९ यावर्षीचे अध्यक्ष अशोक येणेगुरे, सचिव राजकुमार कोकळगी, खजिनदार ओंकारेश्वर उटगे यांचा पदग्रहण सोहळा आज शनिवार ता. १४ जुलैला सायंकाळी 
लोकापुरे मल्टीपर्पज हाॅल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती जयेश पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट प्रशांत सिंगी तर पदग्रहण अधिकारी म्हणून उपप्रांतपाल आनंद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी यशवंत धोंगडे, नसरोद्दीन मुतवल्ली, सोनाली शिंदे, दीपमाला अडवितोटे, रत्नाकर पाटील, सिद्धाराम कल्याणशेट्टी, सुभाष गडसिंग, राजेंद्र हत्ते, राजशेखर हिप्परगी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रगीतानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. मान्यवरांच्या संदेशाचे वाचन सोनल जाजू यांनी केले.

विलास कोरे आणि दिनेश पटेल यांनी आपल्या काळात मागील वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा सांगितला. सामाजिक कार्यात अक्कलकोट शहर व तालुक्यात सतत अग्रेसर असलेल्या रोटरी क्लबने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्या कामाची धुरा पुढील वर्षासाठी येणेगुरे व कोकळगी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विलास कोरे यांनी अशोक येणगुरे यांच्याकडे धुरा सोपवली.

यावेळी नूतन कोषाध्यक्ष म्हणून ओंकारेश्वर उटगे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांचा पदग्रहण झाला. यावेळी मावळते अध्यक्ष विलास कोरे, सचिव दिनेश पटेल, कोषाध्यक्ष वैजनाथ तालीकोटी यांच्यासह माजी अध्यक्ष एजाज मुतवल्ली, रविकिरण शहा, महेश जवळगी, सुनील बोराळकर, नीलकंठ कापसे, आनंद गंदगे, निरंजन शहा, सिद्धाराम मसुती, बसवराज अडवितोटे, प्रकाश घिवारे, निखिल मेहता, जितेंद्रकुमार जाजू, सतीश शिंदे,
प्रसाद काळे, बसवराज चिणकेकर, सचिन किरनळळी, निनाद शहा,
शिवा शिवणगी, शैलेश जाधव, दत्ता कटारे आदीनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपूल शहा आणि रुपाली शहा यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com