प्रत्येक जिल्ह्यात भरणार कृषी महोत्सव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

कोल्हापूर - शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच कृषीतील विविध संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याकरिता राज्यात सर्व जिह्यांमध्ये कृषी महोत्सव भरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

महोत्सव घेण्यास शासकीय यंत्रणा सक्षम नसेल, तर अनुभवी, व्यावसायिक ठेकेदाराच्या मदतीने महोत्सव घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी वीस लाखांची तरतूद केली आहे.

कोल्हापूर - शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच कृषीतील विविध संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याकरिता राज्यात सर्व जिह्यांमध्ये कृषी महोत्सव भरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

महोत्सव घेण्यास शासकीय यंत्रणा सक्षम नसेल, तर अनुभवी, व्यावसायिक ठेकेदाराच्या मदतीने महोत्सव घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यासाठी वीस लाखांची तरतूद केली आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शासन अनेक योजना राबविते. त्यामध्ये अवजारांपासून बी-बियाणांच्या खरेदीसाठी सवलती, विहिरीसाठी अनुदान दिले जाते. याशिवाय जादा उत्पन्न घेण्यासाठी स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी पीक स्पर्धा घेऊन विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतात.

शेतकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने जसे उपक्रम राबवितात त्याचप्रकारे काही संस्था किंवा व्यक्‍तीदेखील कृषी प्रदर्शनाचे आयोजन करतात. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने नेटके संयोजन करत कृषी प्रदर्शन भरविले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची बदली झाल्यानंतर मात्र हा उपक्रम बंद पडला. 

कृषीविषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवावी, समूह गट संघटित करून शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषिविषयक परिसंवाद व व्याख्यानांच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण व्हावी या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात हा कृषी महोत्सव भरविण्यात येणार आहे. यात कृषी मालाच्या प्रदर्शनाबरोबरच विविध कंपन्यांचे स्टॉल, खाद्य पदार्थांचे स्टॉल असणार आहेत. 

जिल्हा स्तरावर कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडीत एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात विविध कृषी महामंडळे, कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बचत गट, शेतीशी संबंधीत कंपन्या यांचा यामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. अडीच ते तीन एकर जागेत हा महोत्सव भरविण्यात येणार आहे. पाच दिवस हा महोत्सव चालणार आहे.
 

काही ठळक उद्देश
विकसित तंत्रज्ञान पोचावे
शासकीय योजनांची माहिती मिळावी 
समूह गट करून कंपन्यांची क्षमता बांधणी 
उत्पादनास योग्य भाव मिळावा